निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळे सौदागर येथील एका मसाज सेंटरवर पोलिसांनी शुक्रवारी (२९ जुलै) छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मसाज पार्लर चालविणा-या दोघांना जेरबंद करून तेथून थायलंडच्या पाच तरुणींची सुटका केली आहे.
अमोल खंडू जाधव (वय ३१, रा. कोकणे चौक, मुळ रा. कोल्हापूर) आणि दिलू गुआनडे जिबा (वय २१, रा. ताडीगुत्तास चौक, मुंडवा, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथून ३ हजार ५०० रुपये, एक मोबाईल, असा मुद्देमाल जप्त केला. तसेच, पोलिसांनी घटनास्थळारून थायलंडच्या पाच युवतींची सूटका करून मसाज पार्लर चालविणा-या दोघांना जेरबंद केले. यापूर्वी बाणेर-औंध लिंक रोडवरील उच्चभ्रू सोसायटीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उध्वस्त केले होते. त्यानंतर पिंपळे सौदागरमध्ये आणखी एक हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड झाले आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शितल भालेकर, चंद्रकांत जाधव, पोलिस कर्मचारी नितीन लोंढे, संदीप गायकवाड, संजय गिरमे, रमेश लोहकरे, नितिन तेलंगे, गितांजली जाधव, कविता नलावडे, सरस्वती कागणे, ननिता येळे, सचिन शिंदे यांनी ही कारावई केली.