निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कासारवाडी येथील जे.आर.डी. टाटा उड्डाणपुलाच्या शेजारी बांधण्यात आलेल्या रॅम्पची पाहणी महापालिका पदाधिकारी व अधिका-यांनी केली.
महापौर नितीन काळजे यांच्यासह स्थायी समिती सभापती सिमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, जैव विविधता व्यवस्थापनसमिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, आशा धायगुडे-शेंडगे, माधुरी कुलकर्णी, सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवने आदी उपस्थित होते. कासारवाडी येथील जे.आर.डी. टाटा उड्डाणपुलाच्या शेजारी बांधण्यात आलेल्या रॅम्पचा वापर नागरिकांसाठी ८ दिवसात खुला करण्याबाबतच्या सूचना यावेळी महापौर काळजे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.