निर्भीडसत्ता न्यूज –
देवाचे स्वरूप कवेत घेऊ पहाणारे शब्द आणि या शब्दांना झेलून सांभाळून ठेवणारी कुपी म्हणजे ग्रंथ, जो ही कुपी सांभाळतो व त्यातील अवीट अमृत आयुष्यभर चाखतो, तोच अमर होत असतो. संतांचे ग्रंथ हे आयुष्यरूपी मार्गावरील मार्गदर्शक दिपस्तंभ आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे यांनी व्यक्त केले.
पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात श्रावणमासा निमित्त शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने शिवलिला अमृत ग्रंथ पारायनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काटे बोलत होते.
नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवलिला अमृत ग्रंथाचे पुजन करून पारायन सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले.
शिवशंभो सेवा मंडळाचे संस्थापक माऊली हांडे, बाळासाहेब काटे, गणेश काटे, हनुमंत भालेकर, पुजारी, मंडळाचे सर्व सभासद व परिसरातील भाविक भक्त व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .
नगरसेवक नाना काटे म्हणाले कि, संतांनी हे ग्रंथ आत्मसात केले आहेत व ग्रंथरचना ज्ञान जतन करण्याची सोयही करून ठेवली आहे. आपण ही ज्ञानपरंपरा जतन केली पाहिजे व आपले योगदान दिले पाहिजे.