निर्भीडसत्ता न्यूज –
फाईल क्लिअर करण्यासाठी ठेकेदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) जाळ्यात सापडला. के. बी. शिंगे असे लाचखोर लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. शिंगे याने फाईल क्लिअर करण्यासाठी एका ठेकेदाराकडे लाच मागितली होती. त्यामुळे ठेकेदाराने याप्रकरणाची एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सापळा रचून ठेकेदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेताना शिंगे याला रंगेहाथ पकडले.
गेल्या चार महिन्यात महापालिकेचे चार अधिकारी व कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. महापालिका आयुक्तांचे स्टेनो, शिक्षणाधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि आता लेखाधिकारी पैसे घेताना सापडले आहेत.