निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहर खड्डे मुक्त करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली आहे.
नगरसेवक भोसले यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये सर्वच प्रमुख रस्त्यांवर व प्रभागांध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो व खड्डाच्या अंदाज येत नसल्याने अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे.
लवकरात लवकर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी आणि शहर खड्डेमुक्त करावे असे नगरसेवक भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.