निर्भीडसत्ता न्यूज –
आयुक्त, बाजार समिती पदाधिका-यासमवेत पाहणी
पिंपरीतील भाजी मंडईला महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनआथ पवार यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि बाजार समितीच्या पदाधिका-यांसह बुधवारी (दि.२) भेट दिली. मंडईची पाहणी केल्यानंतर मंडईतील समस्या सोडविण्याच्या सूचना महापौर, पक्षनेत्यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, सचिव डॉ. पी. एल. इंगळे, उप मुख्यप्रशासक भुषण तुपे, संचालक एकनाथ टिळे, पिंपरी विभाग प्रमुख संतोष शिंदे आदी उपस्थित होते. मंडईतील दुस-या मजल्यावरील गाळे वापरावीना पडून असल्याने पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. फुलांचा व्यापार करणा-यांना बसण्यासाठी गाळे नाहीत. मंडईत घाणीचे साम्राज्य आहे. नियमित स्वच्छता करावी, मंडईत योग्य त्या सुधारणा द्याव्यात, अशा सूचना तात्काळ आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या.