निर्भीडसत्ता न्यूज –
थेरगावमध्ये सभागृह म्हणून बांधलेल्या वास्तूचे बॅडमिंटन हॉलमध्ये रुपांतर करण्यात आले. मात्र, ते मानांकनानुसार नसल्याने खेळाडूंना अडचणी येत असून नव्याने बॅडमिंटन हॉल उभारावा, अशी मागणी नगरसेविका माया बारणे यांनी केली आहे.
बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डांगे चौकाजवळ हा बॅडमिंटन हॉ़ल आहे. त्याची इमारत १९८९ साली सभागृह म्हणून बांधण्यात आली होती. मात्र, नंतर त्याच सभागृहाचे रुंपातर बॅडमिंटन हॉलमध्ये करण्यात आले. त्यामुळे खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत. दिवसेंदिवस खेळाडूंची सख्या वाढत आहे. त्यामुळे हा हॉल बँडमिंटन खेळाच्या मानांकनानुसार बांधावा. तसेच, राजीव गांधी क्रीडा संकुलात असलेला बँड बिंटन हॉल भाड्याने देण्यात आला होता. त्याची मूदत संपली असल्याने तोही पालिकेने ताब्यात घेऊन परिसरातील होतकरू खेळाडूंसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बारणे यांनी केली आहे.