निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्र सरकारने ओबीसी शिष्यवृत्तीच्या तरतूद रक्कमेत कपात केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सचिन औटे, शहर संघटक विजय लोखंडे, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, लीगल सेलचे शहराध्यक्ष सुनील कड, राहुल आहेर, सतीश चोरमले, उत्तम आल्हाट, नगरसेविका वैशाली घोडेकर, संगिता ताम्हाणे, मंदा आल्हाट, मिनाक्षी उंबरकर, प्राजक्ता कलगुंडे, शकुंतला भाट, विशाल काळभोर, संयोजिता घोडके, श्वेता गायकवाड, महादेवी थोरात, सिंधुताई पांढारकर, प्राजक्ता कलगुंडे, अशोक कुंभार, विनय शिंदे, सलीम सय्यद, हर्षल भदाने आदी सहभागी झाले होते.