निर्भीडसत्ता न्यूज –
अनधिकृत जाहिरातींचे प्रमाण अधिक आहेत. शहरात अटी-शर्तीनुसार नसणा-या सर्व अनधिकृत जाहिरातदारांकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड आकारावा, असे आदेश स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी बुधवारी दिले आहेत.
स्थायी समिती बैठकीत अनधिकृत जाहिरातींबाबत चर्चा झाली. अटी, शर्ती पाळल्या जात नसल्यावरून स्थायी समितीने याआधी टिका केली होती. महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागाने नियमावली प्रसिध्द करून फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला. शहरात एकूण 1850 जाहरितींपैकी महापालिकेच्या २७ आहेत. इतर जाहिरातींपैकी अनके अनधिकृत आहेत. या होर्डिग्जधारकांकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंडा आकारण्यात यावा. जाहिरात दर वाढविण्याबाबतचाही विचार असल्याचे सभापती सीमा सावळे यांनी सांगितले.
दरम्यान, स्थायी सदस्य प्रा. उत्तम केंदळे यांनी शहरात सुमारे सहा हजार क्युऑक्स जाहिराती अनधिकृतपणे लावल्या असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यातूनच पालिकेला मोठ्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. प्रशासनाने याबाबतही कार्यवाही करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.