निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, माजी महापौर संजोग वाघेरे, नगरसेविका सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, चंदा लोखंडे, अश्विनी बोबडे, नगरसेवक तुषार कामठे, नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मनोज लोणकर आदी उपस्थित होते.