निर्भीडसत्ता न्यूज –
आधुनिक औद्योगीकिकरणाच्या नाविण्यपुर्ण गरजा पुर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ची कौशल्य क्षमता विकसीत करावी. सत्तावीस वर्षांपुर्वी स्व. खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील औद्योगीक क्षेत्रात अभियंत्यांची गरज ओळखून मुल्यवर्धित शिक्षणाचे ध्येय ठेवून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करण्यात आली. केजी ते पीएचडी पर्यंतचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेत उच्चशिक्षीत प्राध्यापक वर्ग कार्यरत आहे. त्यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.
निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील प्रथम वर्ष विभागाच्या इंडक्शन प्रोग्रॅमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव व्ही.एस.काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई, गोरख भालेकर, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्रा. डॉ. हरीश तिवारी, विभाग प्रमुख प्रा. शुभदा फुलंबरकर व पालक प्रतिनिधी डॉ. भावना बुलानी, डॉ. सचिन गेंगजे आदी उपस्थित होते.
विभाग प्रमुख प्रा. शुभदा फुलंबरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या एकत्रित सहभागाची गरज विषद केली. प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच उच्च शिक्षण कौशल्य विकास व उद्योजगता यांचे महत्व व त्यासाठी महाविद्यालयातील रिसर्च ॲन्ड इनोव्हेशन, हायर स्टी सेल (उच्च शिक्षण विभाग), विद्यार्थी विकास व कल्याण कक्ष या अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती दिली. या परीपुर्ण सुविधांचा विद्यार्थ्यांनी पुरेपुर उपयोग करुन आपला सर्वांगीण विकास करावा असे आवाहन केले.
विश्वस्त भाईजान काझी यांनी विद्यार्थ्यांना उच्चतम गुणवत्तेबरोबरच, सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवावी असे सांगितले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. जयंत उमाळे, विद्यार्थी विकास व कल्याण अधिष्ठाता डॉ. शितल भंडारी, संशोधन व नाविन्यता अधिष्ठाता डॉ. संजय लकडे, औद्योगिक व शैक्षणिक संस्था अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये 1400 विद्यार्थी व पालक यांनी सहभाग घेतला.
शेवटच्या टप्प्यात पालक व विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर आणि विभाग प्रमुखांनी निरसन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. प्रांजल जोग, प्रा. सुवर्णा शेटे यांनी सहभाग घेतला तर सुत्रसंचालन प्रा. सोनल शिर्के व प्रा. मीरा थोरात यांनी केले प्रा. प्रांजल जोग यांनी उपस्थितांचे आभार मानले.