निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत.
महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच अजितदादांच्या बालेकिल्ल्यात येणारे मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले लागले आहे. येत्या १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेच्या शहरातील विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. व शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार आहे.