मेढा – जावली
सोमनाथ साखरे
निर्भीडसत्ता न्यूज –
तालुक्यातील सर्व सातबारे ऑनलाईन करणार असल्याने त्यातील त्रुटींची पुर्तता होईपर्यत सातबारे ऑनलाईन करू नयेत. घाईने सातबारा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला जबाबदार धरू नये असे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जावली तालुक्याच्या वतीने तहसिलदार रोहीणी आखाडे यांना देणेत आले आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जावली तालुक्याच्यावतीने देणेत निवेदनात दि. १ ऑगस्ट पासून तालुक्यातील सर्व खातेदार ऑनलाईन सातबारा उतारे मिळतील अशी घोषणा आपण करणार आहात असे समजते. जमाबंदी आयुक्त यांनी खाता दुरुस्तीची सूविधा दि. १२ जुलै पासून उपलब्ध करुन दिली आहे असे नमुद करण्यात आले आहे.
परंतु खाता दुरूस्ती १ ते २६ अहवाल दुरुस्त करावे लागतात. रिएडीट करताना सॉप्टवेअरमधिल त्रुटीमुळे खाता दुरूस्तीनंतर सातबारा चुकीचे दिसतात किंवा कोरे होतात. तसेच खाता एकत्रिकरणामुळे अहवाल ५ तयार होत असून अहवाल ५ किंवा ७ दुरुस्त केले नंतर सातबारा कोरा होत आहे. त्यामुळे ई सॉप्टवेअरमधिल चुकीसाठी तलाठी व मंडल अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येवु नये असे संघटणेने निवेदनात म्हटले आहे.
तलाठी संघटनेने निवेदनात नमूद केले आहे की, अशी परिस्थीती असताना सातबारा घोषीत करणे संयुक्तीत होणार नाही अशी आमची धारणा आहे. तसेच चुकीचे काम करून प्रमाणपत्र देणेबाबत सक्ती करू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जावली तालुकाध्यक्ष एस.व्ही. ताटे, उपाध्यक्ष एम.पी. गुरव, सरचिटणीस जी.जी. साळुंखे, संघटनेचे पी.एस. ओंबळे, ए.एच. मगरे, एस.डी. पिसे, एस.एस. गुजर, एस.व्ही. ढाकणे, अभंग, सावंत, शिंगटे, आंबवणे आदींच्या सह्या निवेदनावर आहेत.
या निवेदनाच्या जमाबंदीआयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.