जावली – मेढा
निर्भीडसत्ता न्यूज –
भाजपच्या जावली तालुका उपाध्यक्षपदी प्रकाश सुतार यांची नियुक्ती करण्यात आली. बामणोली विभागाला पद मिळाल्याने उत्साहाचे वातावरण कार्यकर्त्यामध्ये आहे.भाजपचे जावली तालुका अध्यक्ष दत्तात्रय साळुंखे यांनी नियुक्तीचे पत्र दिले.
सुतार यांच्या निवडीने बामणोली विभागाला पद दिल्याने भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये दोन क्रमांकाची मते मिळाली असून बामणोली विभागात पद दिल्याने समतोल राखला जावून भाजपाची ताकद वाढणार असल्याचे हि दिपक पवार यांनी सांगितले.
सुतार हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. पक्षवाढीसाठी त्यांनी सामाजिक,शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उपक्रम राबिवले आहेत त्यांच्या या निवडीमुळे परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.