निर्भीडसत्ता न्यूज –
सातव्या योगा चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक मिळालेल्या निगडीतील रुपाली तरवडे, श्रेया कंधारे, नुपूर मोरे आणि संचिता भोईर या योगपटूंचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी सत्कार केला.यावेळी रज्जाक पानसरे उपस्थित होते.
क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी लोहगाव येथील विमानतळावर जाऊन या चारही योगपटूंचे अभिनंदन केले. या चारही योगपटूंनी सुवर्णपदक मिळवून पिंपरी-चिंचवडला नावलौकिक प्राप्त करून दिल्याचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी सांगितले.