निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण विकास समितीचे सदस्य यांनी इस्कॉन फुड रिलीफ फाऊडेंशन संस्थेला भेट दिली. महिला व बालकल्याण सभापती सुनिता तापकीर, उपसभापती योगिता नागरगोजे, सुलक्षणा धर, रेखा दर्शले, निकिता कदम, सोनाली गव्हाणे, चंदा लोखंडे, वैशाली घोडेकर, आरती चोंधे, निर्मला कुटे, सागर आंघोळकर यांनी इस्कॉन संस्थेच्या स्वंयपाकगृहाला भेट दिली.
सदर संस्था महापालिकेच्या ७८ शांळाना शालेय पोषण आहार गेली ११ वर्षापासुन पुरवित आहे व त्याचा लाभ २५००० विद्यार्थी घेत आहे. या संस्थेत खिचडी अतिशय स्वच्छ ठिकाणी शिजवली जाते तसेच धान्य धुवुन स्वच्छ निवडुन वापरले जाते. मसाले व इतर साहित्य सुध्दा स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी ठेवणेत आलेले आहेत. आहाराची चव सुध्दा चांगली असुन मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली व्यवस्था आढळुन आल्याचे महिला व बालकल्याण सभापती सुनीता तापकिर यांनी सांगितले येथील आधुनिक साहित्य, बॉयलर, स्टेनलेस स्टीलची भांडी, भाजी कापण्याची उपकरणे या प्रकारच्या उपकरणाने स्टीम ( वाफ) द्वारे स्वयंपाक तयार केला जात असल्याबाबतची माहिती इस्कॉन चे प्रतिनिधी माधवकांत दास, सितापती दास व हरिष शेट्टी यांनी दिली.