निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवडयेथील प्रेमलोक पार्क, एसकेएफ कंपनी परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिकेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून उभारलेल्या “ई-टॉयलेट”चे उद्घाटन नगरसेविका माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके आणि सचिन चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे, पोलिस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश लोंढे, एक्साईड बॅटरीचे संचालक संजय गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, उपअभियंता चंद्रकांत कोंडे, कनिष्ठ अभियंता उमेश मोने, निमा गिद, आदी उपस्थित होते.
नगरेसिवका माधुरी कुलकर्णी म्हणाल्या कि, कंपन्यांकडून गोळा झालेला सीएसआर निधी समाजोपयोगी कामासाठी वापरण्यात येतो. या उपक्रमांमध्ये दारिद्र्य निर्मुलन, आरोग्य सुविधा, पेयजल पुरवठा, स्वच्छता यांचा समावेश असून विकास घडविण्यासाठी ही योजना महत्त्वाकांक्षी ठरते. तसेच शहराच्या विकासात कंपन्यांचा हातभार लागावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
नगरसेविका करुणा चिंचवडे म्हणाल्या, शहर स्वच्छतेसाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी एक्साईड बॅटरीच्यावतीने राबविला जाणारा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
नगरसेवक नामदेव ढाके म्हणाले, “एक्साईड बॅटरीच्या माध्यमातून १२ लाख रुपये निधी खर्चून ई-टॉयलेटचा उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी दोन आणि पुरुषांसाठी दोन अशा चार ई-टॉयलेट उभारण्यात आले आहेत.