निर्भीडसत्ता न्यूज –
सत्ताधारी भाजपने चुकीच्या पध्दतीने घेतलेल्या निर्णयाच्या आधारे कामे सुरू केली आहे. मात्र, ते नियमानुसार नसल्याने निविदा प्रक्रिया रद्द करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शुक्रवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत केली.
योगेश बहल म्हणाले की, महापालिकेच्या २० जून २०२७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने चालू २०१७-१८ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पाला उपसूचनेव्दारे प्रशासकीय मान्यता दिली. शौचालय बांधण्यासाठी अनुदान अदा करण्याचा अवलोकनाचा विषय पालिकेच्या अजेंड्यावर होता. या विषयाला सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला ब्लॅकेट (ढोबळ) प्रशासकीय मंजुरीची उपसूचना देवून घाईने निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, आयुक्त हर्डीकर यांनी अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. हा आयुक्तांचा आदेश नियमबाह्य आहे. त्या निर्णयानुसार महापालिकेने कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्या देखील नियमबाह्य व चुकीच्या असल्याने या कामांना तात्काळ स्थगिती द्यावी, असे बहल यांनी म्हटले आहे.