पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकणा-या श्रीलंकन फलंदाजांनी दुस-या डावात ब-यापैकी प्रतिकार केला आहे.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकणा-या श्रीलंकन फलंदाजांनी दुस-या डावात ब-यापैकी प्रतिकार केला आहे. तिस-या दिवस अखेर श्रीलंकेच्या दोन बाद 209 धावा झाल्या आहेत. श्रीलंकेचा संघ अजूनही 230 धावांनी पिछाडीवर आहे.
भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर सलामीवीर उपुल थरंगा (2) लगेच बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डावही अडचणीत येईल असे वाटत होते. पण करुणारत्ने आणि मेंडीसने श्रीलंकेचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी 191 धावांची भागीदारी केली. दुस-या डावात श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने (110) शानदार शतक झळकवले. सलामीवर करुणारत्ने (92) धावांवर नाबाद आहे. दिवसअखेर हार्दिक पांडयाने ही जोडी फोडली. त्याने मेंडीसला वृद्धीमान सहाकरवी झेलबाद केले.