निर्भीडसत्ता न्यूज –
स्वाईन फ्लूमुळे चिंचवड येथील ६८ वर्षीय वृध्द महिला बुधवारी (दि. १५) दगावली आहे. शहरातील चालू वर्षांतील मृतांची संख्या ६१ इतकी झाली आहे.
या महिलेला ८ नोव्हेंबरला चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. चालू वर्षात १ जानेवारीपासून आजअखेर स्वाईन फ्ल्यूचे ४१३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६१ रुग्ण दगावले आहेत.