निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिका विधी समितीच्या बैठकीत ऐनवेळी दाखल केलेल्या प्रस्तावामुळे संबधित कामात अनियमितता दिसते आहे. त्यासाठी संबधी वाकड ते हिंजवडी रस्त्याच्या कामाची त्रीसदस्यीय समितीमार्फच चौकशी करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यात कामठे यांनी म्हटले आहे की, वाकड ते हिंजवडी बीआरटीएस रस्त्यांच्या कामासाठी ६ कोटी ५५ लाख ३ हजार ३७२ रुपयांची निविदा काढण्यात आली होती. हे काम मे. एच. सी. कटारिया यांना दिले आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे या रस्त्याचे पुढील काम थांबलेले आहे. हे काम ५५ टक्के इतकेच पूर्ण झालेले आहे.