निर्भीडसत्ता न्यूज –
शहरात स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. मागील दोन आठवड्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या पुर्वीच्याच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शहरातील वातावरणात बदल होवून थंडी अधिक जाणवू लागली आहे. साधारणता स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरण्यासाठी हे वातावरण पोषक असते. परंतू, स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मागील सात-आठ महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. शहरात स्वाईन फ्लूचे दिवसाकाठी दोन ते तीन रुग्ण पॉझिटिव्हचे आढळत होते. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
मात्र, गेल्या दोन आठवड्यापासून शहरातील स्वाइन फ्लूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. यावेळी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असणारी भितीही कमी होत आहे. यंदाच्या वर्षी स्वाइन फ्लूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 413 वर पोहचली होती. सध्या त्याच रुग्णावर उपचार सुरु आहे. तर 61 जणांचा मृत्यू झाला असून 10 हजार 19 संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या आहेत.