निर्भीडसत्ता न्यूज –
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरु होणार आहेत. दहावीला 16 लाख 38 हजार 552 विद्यार्थी बसले आहेत, तर 11 लाख 86 हजार 144 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
दहावीची परीक्षा 5 मार्चला सुरु होणार असून 4 एप्रिलला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा 5 मार्चला सुरु होऊन 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.