निर्भीड न्यूज –
काळेवाडी-रहाटणी प्रभाग क्रमांक 48 मधील साई प्रितम नगरी ते सुयोग कॉलनी दरम्यानच्या 12 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. महापालिकेतर्फे शनिवार, दि. 30 एप्रिल रोजी या कामास सुरुवात करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक कैलास थोपटे आणि नगरसेविका अनिता तापकीर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता मच्छिंद्र तापकीर, युवा नेता कुणाल थोपटे, सागर तापकीर, सुरेश चव्हाण, नितीन निवंगुणे, विनय खराडे, नितेश नायर, विजय भातखुडे, महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे आदी या वेळी उपस्थित होते.