शहरातील नागरिकांसाठी वाल्हेकरवाडी येथे मोफत आधार कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्मिता वाल्हेकर स्पोर्टस् अॅकॅडमी आणि उद्योजक तेजींदरसिंग अहलूवालीया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रविवार,दि. 8 मे रोजी याचे उद्घाटन करण्यात आले.
वाल्हेकरवाडीतील सायली कॉम्प्लेक्स जवळील सर्वे क्रमांक 123 येथील स्मिता वाल्हेकर स्पोर्टस्अॅकॅडमी येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
स्मिता वाल्हेकर स्पोर्टस् अॅकॅडमीचे संस्थापक भरत वाल्हेकर, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील, गणेश कवडे, कैलास आहेर, विनायक वाल्हेकर, विजय सरोदे, शांती निकेतन हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन बेबी जॉर्ज, संदीप धाईंजे,उमेश पाटील, मुकीम शेख, पिंपरी-चिंचवड पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष विशाल शिरुळे,अर्चना बारकुल, अरुंधती माने, राजू बनकर, बाळासाहेब शिवले, विनोद यादव, विलास चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.
तानाजी वाल्हेकर या वेळी म्हणाले की, बँक खात्यासह आधार कार्ड सर्वांसाठी अनिवार्य आहे.सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. आपण सर्वांनीही अद्ययावत होणे आवश्यक आहे.सर्व शासकीय योजना, आर्थिक व्यवहार यासाठी ऑनलाईन पध्दतीवर भर देण्यात येत आहे.त्यासाठी आपण आधार कार्ड आणि बँकेत मोफत बचत खाते सुरू करण्याच्या या सुविधेचा लाभ घेतला पाहिजे. दोन लाखांचा अपघात विमाही येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाल्हेकर यांनी या वेळी केले.
अहलूवालीया या वेळी म्हणाले की, वाल्हेकरवाडतील नागरिकांसाठी आमच्याकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मोफत आधार कार्ड, अॅक्सिस बँकेत निशुल्क बचत खाते यासह दोन लाख रुपयांचा अपघात विमा मोफत आदी सुविधांचा यात समावेश आहे.वाल्हेकरवाडीसह गुरुव्दारा परिसरातील नागरिकांनी त्याचा लाभ घेण्यासाठी 8796308988 आणि9145697879 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहनही अहलूवालीया यांनी या वेळी केले.