निर्भीडसत्ता न्यूज –
कन्वरजित पॉप्युलर बॉक्सिंग क्लबच्या वतीने खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मुष्टियुध्द प्रशिक्षक व दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते अजितसिंग कोचर यांच्या हस्ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तर स्पर्धेत चकमदार कामगिरी करणार्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
करमजितसिंग सोना, सदानंद साबळे, सुरज विधाते, किरण साठे, अजिंक्य वाघमारे, यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह सन्मानित करण्यात आले. यावेळी रमेश गायकवाड, राजु गायकवाड, आनंद भिकोले, रविंद्र बाईत, शरद रोच आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे चंदन त्रिपाठी यांनी सुत्रसंचालन केले. कन्वरजितसिंह यांनी आभार मानले.