निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटने मार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धेत सहभाग घेऊन कांस्य पदक मिळवल्याबद्दल प्रणित आढाव व रुजुला देव घरे यांचा तसेच त्यांना प्रशिक्षित करणा-या प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.
नगरसदस्य विलास मडीगेरी, राजू मिसाळ, अमित गावडे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, विकास डोळस, नगरसदस्या करुणा चिंचवडे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, साधना मळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.