निर्भीडसत्ता न्यूज –
जयहिंद परिवार, लाईफस्टार ग्लोबल वेलफेअर फौंडेशन, भारतदर्शन वर्ल्ड सेंटर आणि आर्टिस्ट ग्लोबल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कला व हस्तकला आणि भारतदर्शन राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. 27 व 28 ऑक्टोंबर रोजी घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात हा महोत्सव होणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे, अशी माहिती भारतदर्शन वर्ल्ड सेंटरचे प्रमुख नारायण फड यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन 27 रोजी सकाळी 11.45 वा. भटक्या, विमुक्त जाती-जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष भिकूजी (दादा) इदाते यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्र प्रबंधक एच. सी. मित्तल हे असणार आहेत. याप्रसंगी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ कल्याण गंगवाल, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, उद्योजक अविनाश जोगदंड, युवासंत शामजी महाराज आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण देखिल करण्यात येणार आहे. त्यानंतर काव्य संमेलन, लघुचित्रांपात, मुकेश कनेरी यांचे व्याख्यान, सुजाता धडफळे यांच्या हस्तकला प्रात्यक्षिक व ‘बॉलिवूड धमाका’ हा गायणाचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच 28 रोजी ‘योग’ या विषयावर चर्चासत्र होणार असून यामध्ये डॉ मधुसूदन घाणेकर, योगाचार्य विदुला शेंडे, हिमांशू संख्ये, रमेश अगरवाल, स्मिता सोवनी, आदी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ‘सामाजिक संस्थांचे देशाच्या आणि समाजाच्या विकासात योगदान’ या विषयावर मार्गदर्शन व श्रावणबाळ आश्रम आणि बालग्राम बीड येथील संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर नृत्य व प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. महोत्सवाचा समारोप समारंभ सायंकाळी 5.30 वा, होणार असुन याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालहक्क राज्य आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, जम्मू काश्मीरचे पंतप्रधान कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी डॉ सागर डोईफोडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस. एन पठाण, चाटे शिक्षण समूहाचे प्रा. फुलचंद चाटे, उद्योजक आबासाहेब नागरगोजे, तुळशीराम गुट्टे महाराज उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया व्यक्तींना समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.