असे म्हणतात कि, मनुष्य कितीही धनवान, श्रीमंत असला तरी मनाच्या शांतीसाठी तो वाट धरतो ती मंदिराची, यापेक्षा उत्तम स्थान नाहीच. जैन धर्म हा जगातील प्राचीन धर्म आहे, ज्याचे संस्थपाक भगवान ऋषभदेवजी आहेत . जे जैन धर्माचे पहिले तीर्थकर आहेत ज्यांना आदिनाथ भगवान म्हटले जाते . जैन धर्माची मंदिरे जगात विविध ठिकाणी आहेत . चला तर मग या प्रसिद्ध मंदिरांचा आढावा थोडक्यात घेऊया.
पालिताना मंदिर: शत्रुंजय पर्वत, गुजरात
हे मंदिर गुजरात भावनगर जिल्यातील शत्रुंजय पर्वतावर आहे. पालिताना मध्ये 3,000 पेक्षा जास्त मंदिर आहेत जे खूप सुंदर असे कोरीव कामाने सजलेले आहे . या मंदिराला ३८०० पायऱ्या असून, फाल्गुन महिन्यातील छ काऊ यात्रेला जैन धर्मात खूप महत्व आहे. जैन धर्मीय फाल्गुन महिन्यात या तीर्थ स्थळाला जातातच . हे जैन मंदिर जैन धर्मातील २४ तीर्थनकाराना समर्पित आहे . सर्वात उंच पहाडावर भगवान आदिनाथचे मंदिर आहे. पालितानातील या जैन मंदिरांना टक्स असेही म्हटले जाते.
गोमतेश्वर बाहुबली मंदिर, कर्नाटक
56 कि.मी. उंच अशी गोमतेश्वर बाहुबली याची मूर्ती ही जगातील सर्वात उंच प्रतिमा आहे. हे मंदिर कर्नाटकच्या मायसूर जिल्ह्यात इंद्रगिरि नामक पहाडीवर स्थित आहे. असे मानले जाते की हे मंदिर गंगा शासक यांचे मंत्री चमुंडऱ्या यांनी 10 व्या शतकात बनविले होते. बाहुबली हे जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांचे पुत्र होते.
जैन लाल मंदिर, दिल्ली
हे दिल्लीचे सर्वात जुने जैन मंदिर आहे, जे लाल किल्ला आणि चांदनी चौक जवळ आहे. जैन धर्म चे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचे प्रमुख मंदिर येथे आहे . मंदिराची स्थापना १५२६ मध्ये झाली . या मंदिराची निर्मिती लाल दगडाने झाली असल्याने याला लाल मंदिर ना दिले आहे . जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथची प्रतिमा देखील येथे स्थापित आहे.
दिलवाड़ा मंदिर: अरावली श्रृंखला, राजस्थान
दिलवाडा मंदिर राजस्थान मधील सिरोही जिल्यातील माउंट अबू नगर मध्ये स्थित आहे. ११ व्या आणि १३ व्या शतकात वास्तुपाल आणि तेजपाल या दोघं भवानी मिळून या मंदिराची स्थापना केली . माउंट अबू वर स्थित हे मंदिर राजस्थानचे ताजमहल सुद्धा आहे. या मंदिराच्या निर्मितीमध्ये एकूण १५०० कारागिरांचा हात होता. येथील ५ मंदिर वेगवेगळ्या ५ तीर्थनकराना समर्पित आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये जैन ऋषींचे चित्र आणि सुंदर नक्षीदार स्तंभ आहेत . आणि याचबरोबर ३६० तीर्थनकर मूर्ती येथे आहेत.
सोनगिरी मंदिर
सोनगिरी शब्दाचा अर्थ ‘द गोल्डन पीक’ हा आहे. हे मंदिर ग्वालियर आणि झांसी च्या मध्य भागी स्थित आहे. त्याच्या जवळपास ७७ सुंदर जैन मंदिर पहाडावर स्थित आहेत. जैन अनुयायींसाठी सोनगिरी मंदिर प्राथमिक तीर्थस्थळ मानले जाते. अशी मान्यता आहे की याच ठिकाणी जैन धर्मातील पंधरा लाख अनुयायींना मोक्ष प्राप्ती झाली होती . येथील मंदिरात भगवान चंद्रप्रभु यांची ११ फूट उंच प्रतिमा पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे.
रणकपूर जैन मंदिर
राजस्थानमध्ये बनवलेले भव्य रणकपूर जैन मंदिर, जैन धर्माचे पाच प्रमुख तीर्थस्थळां मधील एंक आहे. या मंदिराची निर्मिती १५ व्या शतकात राणा कुंभाचे शासनकाल होता. हे मंदिर जैन पंथाचे सर्वात मोठे आणि सर्वात महत्वाचे मंदिर आहे जे भगवान आदिनाथ याना समर्पित आहे. हे मंदिराच्या परिसरमध्ये एक लहान सूर्य मंदिर देखील आहे.
अजीतनाथ मंदिर
गुजरात स्थित अजीतनाथ जैन मंदिर प्राचीनतम जैन मंदिरांपैकी एक मानले जाते. ११२१ मध्ये या मंदिराची निर्मिती चालुक्य चे राजा कुमारपाल यांनी केली. कार्तिक आणि चैत्र महिन्यामध्ये हजारो श्रद्धालु भगवान अजितनाथांचें दर्शन घेण्यासाठी जातात.
सम्मेद शिखरजी मंदिर
शिखर जी मंदिर हे पारसनाथ मंदिर या नावाने देखील ओळखले जाते. हे मंदिर झारखंड मधील गिरिडीह जिल्यातील पारसनाथ पहाडावर स्थित आहे. असे मानले जाते की, येथे जैन धर्माचे २० तीर्थंकर आणि बरेच संतांना मोक्ष प्राप्त झालेली आहे. यामुळे ही जागा तीर्थराज्य म्हणून ओळखली जाते. हे मंदिर २०० किलोमीट क्षेत्रात पसरले आहे आणि ४४३० फीट उंच पर्वतावर आहे.
धर्मनाथ मंदिर
धर्मनाथ देसार जैन मंदिर केरळ मधील कोचीन शहर मध्ये आहे. हे मंदिर जैन धर्मातील भगवान धर्मनाथ याना समर्पित आहे, हे जैन समुदायातील लोकांनी बनवलेले १०० वर्षे जुने मंदिर आहे. याची निर्मिती इको दगडाने केली गेली आहे . यात सुंदर नक्काशीदार संरचना देखील आहेत.
श्री महावीर जैन मंदिर
हे मंदिर संपूर्ण भारत मध्ये जैन धर्माचे पवित्र स्थान आहे. असे मानले जाते की या मंदिराची निर्मिती बसवा निवासी श्री अमरचंद बिलाला ने केली. गंभीर नदी किनाऱ्यावर हे मंदिर आहे. येथे २४ वें तीर्थंकर श्री वर्धमान महावीर यांची २९ फुट उंच मूर्ति येथे विराजमान आहे. अशी मान्यता आहे की या मूर्तीची निर्मिती महावीर जिच्या २५०० व्या वर्षगांठ असताना करण्यात आली.
पार्श्वनाथ मंदिर
पार्श्वनाथ मंदिर ची निर्मिती १० व्या शतकात मध्यप्रदेश मधील खजुराहो येथे झाली. हे जैन मंदिर आदित्यनाथ याना समर्पित आहे, पण १९ व्या शतकामध्ये भगवान पार्शवनाथांची प्रतिमा येथे स्थापन केल्यामुळे याला पार्श्वनाथ मंदिर असेही म्हटले जाते. खजुराहो च्या मंदिराला भारत भरातून लोक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात . पार्श्वनाथ मंदिर भारतीय वास्तूकलेचा एक बेजोड नमुना आहे .
मीरपुर जैन मंदिर
राजस्थान मधील सिरोही जिल्यातील मीरपुर येथे मीरपुर जैन मंदिर स्थित आहे. मीरपूर जैन मंदिर राजस्थान मध्ये मार्बल पासून बनवलेले सर्वात जुने मंदिर मानले जाते. त्याची निर्मिती ९ व्या शतकात झाली. हे ११०० वर्ष जुने मंदिर आहे, जे भगवान परशवनाथ याना समर्पित आहे. या मंदिराची लोकप्रियता इतकी आहे की या मंदिरा चा उल्लेख ‘वर्ल्ड अँड इनसाइक्लोपिडिया ऑफ आर्ट’ मध्ये केला आहे .
नरेली जैन मंदिर
जयपुरच्या अजमेर मध्ये असलेले नरेली जैन मंदिराची निर्मिती १९९४ मध्ये झाली. या मंदिराच्या निर्मितीसाठी जवळ जवळ १०० कोटीं चा खर्च झालेला आहे . हे मंदिर जयपुर मधील प्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील या मंदिरांची लोकप्रियता खूप आहे. जैन मंदिरांची संख्या भारत बाहेर हि बऱ्याच देशात आहे . जसे कि , कॅनडा, हॉंगकॉंग, नेपाळ , पाकिस्तान , इंग्लंड आणि आस्ट्रेलिया बरोबर इतर देशात हि आहे.
रिता मदनलाल शेटीया, पुणे.