निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांकडून 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2019 या पहिला सहामाहीत एकूण 341 कोटी 73 लाख 54 हजार 931 रूपयांचा भरणा झाला आहे. थेरगाव कार्यालयाने सर्वांधिक 72 कोटी 26 लाख 83 हजार 568 रक्कमेचा भरणा केला आहे.
शहरात एकूण सव्वापाच लाख मिळकतधारकांची नोंद पालिकेकडे आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या पहिला सहामाहीत थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणा केल्यास सामान्यकरात 5 ते 10 टक्के सूट दिली जाते. पहिल्या सहामाहीत एकूण 2 लाख 45 हजार 921 मिळकतधारकांनी भरणा केला आहे. त्यात थेरगाव कार्यालयाने सर्वांधिक 72 कोटी 27 लाखांचा कर जमा केला आहे. त्या कार्यालयात 49 हजार 569 मिळकतधारकांनी कर जमा केला.
पाठोपाठ सांगवी कार्यालयातून 35 कोटी 95 लाख 54 हजार 447 रूपयांचा भरणा झाला आहे. तेथे एकूण 28 हजार 563 जणांनी कर भरला आहे. पाठोपाठ भोसरी कार्यालयातून 27 कोटी 18 लाख 10 हजार 543 (16 हजार 614 मिळकतधारक), चिंचवड कार्यालयातून 25 कोटी 37 लाख 19 हजार 187 (26 हजार 515 मिळकतधारक) आणि पिंपरी गावातील कार्यालयातून 23 कोटी 93 लाख 62 हजार 282 (19 हजार 901 मिळकतधारक) रक्कम जमा झाली आहे. तर, चिखली कार्यालयातून 23 कोटी 90 हजार 6 हजार 800, पालिका भवन कार्यालयातून 22 कोटी 93 लाख 23 हजार 827 आणि आकुर्डी कार्यालयातून 21 कोटी 81 लाख 28 हजार 103 रक्कम जमा झाली आहे.
मिळकतकराचा भरणा ऑनलाईनने करण्यास शहरातून पसंती दिली जात आहे. रोख व डीडीने एकूण 86 हजार 238 जणांनी एकूण 72 कोटी 13 लाख 30 हजार 530 रक्कमेचा भरणा झाला आहे. सर्वांधिक सांगवी कार्यालयातून 12 हजार 845 जणांनी या पद्धतीने 12 कोटी 39 लाख 78 हजार 697 रक्कमेचा कर जमा केला आहे.
तर, धनादेशाच्या माध्यमातून 24 हजार 802 जणांनी एकूण 91 कोटी 51 लाख 84 हजार 238 रूपयांचा भरणा केला आहे. सर्वांधिक थेरगाव कार्यालयातून 3 हजार 640 जणांनी धनादेशाद्वारे 12 कोटी 91 लाख 54 हजार 137 रक्कमेचा कर जमा केला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली. कर संकलन विभागास सन 2019-20 या वर्षांसाठी एकूण 482 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
ऑनलाईनद्वारे सर्वांधिक 158 कोटी 34 लाखांचा भरणा
पिंपरी-चिंचवड शहरातून दरवर्षी ऑनलाईन माध्यमातून मिळकतकर भरण्यास मोठी पसंती दिली जात आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल 158 कोटी 34 लाख 56 हजार 606 रक्कम जमा झाली आहे. तब्बल 1 लाख 34 हजार 881 जणांनी ऑनलाईनला प्राधान्य दिले आहे. हे प्रमाण 55 टक्के आहे. थेरगाव कार्यालयातून सर्वांधिक 35 हजार 972 जणांनी 44 कोटी 13 लाख 31 हजार 10 रक्कमेचा भरणा झाला आहे. पाठोपाठ चिंचवड कार्यालयात 13 हजार 927 जणांनी 10 कोटी 96 लाख 46 हजार 194, पिंपरी गाव कार्यालयातून 13 हजार 800 जणांनी 15 कोटी 78 लाख 34 हजार 432 आणि सांगवी कार्यालयातून 12 हजार 807 जणांनी 13 कोटी 4 लाख 49 हजार 686 रक्कमेचा भरणा केला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली.