- पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात महापौर माई ढोरे यांच्या मोहिमेचे उद्घाटन
पिंपरी | निर्भीडसत्ता
पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारपासून (दि. १६) कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात महापौर माई ढोरे यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना पहिली लस टोचून घेतली.
कोरोना लसीकरणासाठी शहरात आठ ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील ८०० जणांना लस टोचण्यात आली.
लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनावेळी खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक संदीप वाघेरे, शैलेश मोरे, बाबू नायर, नगरसेविका उषा वाघेरे, निर्मला कुटे, सविता खुळे, निकिता कदम, अर्चना बारणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, वर्षा डांगे आदी उपस्थित होते.