निर्भीड न्यूज –
स्कूल बसने दिलेल्या धडकेत एका 21 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथे मंगळवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. धडक दिलेली स्कूल बस ही ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलची बस असून, अपघातानंतर बसचा चालक फरार झाला आहे.
सबा साजिद शेख (वय 21, रा. पिंपळे सौदागर), असे अपघात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलची स्कूल बसचा चालक खरात (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमएच 14 सीडब्ल्यू 1335 या क्रमांकाची स्कूल बस पिंपळे सौदागर येथील कुंजीर वस्तीतील पेट्रोल पंपाकडून शिवार गार्डन चौकाकडे जात होती. या वेळी महावितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ सबा शेख हिच्या एमएच 14 ईएक्स 5305 या क्रमांकाच्या अॅक्टिवा या दुचाकीला बसने धडक दिली. या धडकेने दुचाकीवरील सबा शेख हिला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.