निर्भीडसत्ता न्यूज –
अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज याचं निधन झालं आहे. स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली आहे. भय्यूजी महाराज यांना इंदोर मधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दखल करण्यात आलं होत. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रीय असतात. चार वर्षांपूर्वी भय्यू महाराज यांच्या वडिलांचे आणि तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर 30 एप्रिल 2017 रोजी घरच्यांच्या आग्रहाखातर ते डॉ. आयुषी यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. त्यांना कुहू नावाची 13 वर्षांची मुलगीही आहे भय्यूजी महाराजांनी आत्महत्या का केली? त्यांनी हे टोकांच पाऊल का उचललं? यामागे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.