मेढा – करहर
निर्भीडसत्ता न्यूज –
जावळीचे सुपूत्र आणि शिवसेने नेत, माजी सभापती काशिनाथ दादा धनावडे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
काशिनाथ धनावडे यांनी शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम केले. सेनेचे वारे तरुणपणातच वाहत असताना सुंदर पद्धती त्यांनी तरूणांची फळी उभी केली. सर्वसामान्यांच्या, गोरगरीबांच्या हाकेला धावून जाणे, मदत करणे अशा सर्व गुण संपन्न असणाऱ्या सेनेच्या नेत्याला जावली तालुक्याच्या पंचायत समितीचा सभापती होण्याचा मान मिळाला.
सेनेच्या ताबात पंचायत समिती असताना विकासाच्या योजना तळागाळापर्यत पोहचविण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले होते. त्यांच्या जाण्याने तालुक्यातील सेनेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी आमिषे दाखवून सुद्धा शिवसेना सोडली नाही. असा सच्चा शिवसैनिक गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. बाळासाहेबांचे चांगले संबध असणारे व्यक्तीमत्व काशिनाथ धनावडे होते. यांच्या पाश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.