पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज शनिवारी (दि. ४) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते.
चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता.