- आतापर्यंत 6 हजार 355 कोरोनाबाधित बरे
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि.17) एका दिवसांत कोरोनाची लागण झालेले तब्बल 715 रूग्ण आढळून आले. ही आजपर्यंत एका दिवसातील कोरोनाबाधितांची सर्वांत मोठी संख्या आहे. कोरोनाबाधितांचा दहा हजारांचा आकडा आज पार झाला आहे. तसेच, आतापर्यंत तब्बल 6 हजार 355 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.
वायसीएम, भोसरी, कोविड केअर सेंटर आणि खासगी रूग्णालयात एकूण 3 हजार 109 जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 हजार 69 झाली आहे. त्यात शहराबाहेरील रूग्णांची संख्या 279 आहे.
कोरोनाबाधित 341 जण बरे झाल्याने त्यांना शुक्रवारी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे होणार्यांची एकूण संख्या 6 हजार 355 झाली आहे. तर, भोसरी येथील 70 वर्षीय पुरूष , थेरगाव येतील 72 वर्षीय पुरूष, चिंचवड येथील 72 वर्षीय पुरूष, नेहरूनगर येथील 84 वर्षीय पुरूष, पिंपरी येथील 64 वर्षीय पुरूष आणि रहाटणी येथील 65 वर्षीय महिला (65) असे 5 पुरूष व 1 महिला एकूण 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 211 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज एकूण 1 हजार 380 कोरोना संशयितांचे घशातील द्रव्य नमुने घेण्यात आले. तर, आज 973 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकूण 432 जणांना क्वारंटाईन करण्यात आले.