पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
काळेवाडीतील तापकीर शाळेच्या पदाधिकाऱ्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 9 जून 20189 रोजी संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक मंडळ निवडले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून चंद्रकात तापकीर, सचिवपदी मल्हारी तापकीर व इतर पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे. संस्थेच्या वतीने कै श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर,श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, एल.बी.टी. इंग्लिश मेडियम स्कूल या शाळा असून या शाळांमधील कोणत्याही विषयात हस्तक्षेप करण्याचा माजी अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांना अधिकार नसल्याचा खुलासा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत तापकीर व मल्हारी तापकीर यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत तापकीर म्हणाले की, संस्थेचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर हे नवीन संचालक मंडळाला कामकाजात अडथळे आणण्याचा व संस्थेच्या मालमत्तेला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर, संचालक शशिकांत तापकीर व महेंद्र बामगुडे यांनी मच्छिंद्र तापकीर यांना ४१ ई कलमानुसार मनाई करावी असा विनंती अर्ज न्यायालयात दाखल केला. सदर प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून 15 सप्टेंबर 2019 रोजी मल्हारी तापकीर यांचा अर्ज मंजूर करून मच्छिंद्र तापकीर यांना मनाई केलेली आहे.
सदर संस्थेच्या कामकाजाबाबत नियमानुसार बदल अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे. कोणताही हक्क अथवा अधिकार नसताना संस्थेच्या बनावट लेटरपॅडवर मच्छिंद्र तापकीर हे पत्र व्यवहार करीत आहे. याबाबत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे संस्थेने तक्रारी दाखल केल्याचे सचिव मल्हारी तापकीर यांनी सांगितले.