पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात निगडीतील अमृता विद्यालयाच्या संघाने दिघी आर्मी पब्लिक स्कूल संघावर पेनल्टी शूटमध्ये चार गोल मारून विजय संपादन केला.
पिंपरी, संत तुकाराम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 14 वर्षाखालील मुलांची ही स्पर्धा पार पडली. या सामन्यात निगडीतील अमृता विद्यालयाच्या संघ आणि दिघीतील आर्मी पब्लिक स्कूल संघाने शून्य-शून्य बरोबर सामना सुटला. पेनल्टी शूटमध्ये सामन्याचा निकाल लागला. यामध्ये आर्मी स्कूल संघाने तीन पेनल्टी शूट मारले तर अमृता विद्यालयाच्या संघाने चार गोल मारून सामना काबिज केला.
अमृता विद्यालयाच्या संघातर्फे अक्षत यादव, सुशांत कुमदोळ, पुष्कर कुलकर्णी, साई फालके यांनी तर आर्मी स्कूल संघाकडून विवेश पाटील, मोहमद अर्शद, आर्यन भांडवलकर यांनी गोल केले.यावेळी स्पर्धा प्रमुख आत्माराम महाकाल, क्रीडा पर्यवेक्षक चंद्रशेखर कुलकर्णी, अमृता विद्यालयाचे कोच राजेंद्र महाजन, कमलनयन बजाज स्कूल कोच, रवि पिल्ले, पंच प्रमुख हर्बल चपटे, आरती काळभोर, भाऊसाहेब खैरे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.