पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय फलक, बोर्ड व होर्डिग तात्काळ उतविण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकार्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांना दिले आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता 18 जानेवारीपासून लागू झाली आहे. त्यामुळे चिंचवड मतदार संघ क्षेत्रात लागलेले राजकीय फलक, बोर्ड व होर्डिग तात्काळ काढून घ्यावेत. तसेच, पक्षाचे नामफलकही झाकण्यात यावेत. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश उपजिल्हाधिकारी अस्मिता गोरे यांनी पालिका उपायुक्त सचिन ढोले यांना दिले आहेत.