पुणे | निर्भीडसत्ता न्यूज
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांसह पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांची शुक्रवारी (दि.27) भेट घेतली. महापालिकेच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी भानगिरे यांनी आयुक्तांकडे केली.
अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदीच्याविषयी झालेल्या चर्चेत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवित, भरीव निधी देण्याबाबत आश्वस्त केले. तसेच, शहरात असलेल्या नागरी समस्यांविषयी आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, पुणे जिल्हा माथाडी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश माझीरे, युवा सेना खडकवासला विभागप्रमुख निलेश गिरमे, शिवाजीनगर विधानसभाप्रमुख संतोष लांडगे, संजय डोंगरे, महिला आघाडी शहरप्रमुख लीनाताई पानसरे, अयोध्याताई आंधळे, संतोष राजपूत, विकी माने, युवासेना हडपसर विभागप्रमुख योगेश जोशी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.