पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तब्बल 28 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. उमेदवारांना 40 लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा भारत निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. त्या खर्चाचा हिशोब दररोज निवडणूक विभागास सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवाराला प्रचारासाठी विविध प्रकाराचा खर्च करावा लागतो. पत्रके, झेंडे, मफलर, बँच, फेटे तसेच, रिक्षा फिरवणे, वाहनांचा ताफा, कार्यकर्त्यांसाठी खाणे व पिण्याची सोय करावी लागते. पदयात्रा, कोपरा सभा, जाहीर सभा, मेळावा आदींवरही खर्च होतो.
कार्यकर्त्यांच्या जेवणावळीवर लाखो रुपये खर्च करावा लागतो सर्वच खर्चाचा तपशील थेरगाव निवडणूक कार्यालयात दररोज द्यावा लागतो. त्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेत कडक नियम केले आहेत. यासाठी निवडणूक आयोगाकडून दरपत्रकही निश्चित करण्यात आले आहे.