पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा (सीबीएसई) निकाल शुक्रवारी १२ मार्च रोजी जाहीर करण्यात आला.चिंचवड येथील नाॅव्हेल इंटरनॅशनल स्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळविले.
पार्थ तानाजी गर्दी याने ९४ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, तसेच केदार गोपाल वैजे द्वितीय क्रमांक(९३.६%), सार्थक गमे तृतीय क्रमांक(९२.८%) गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अमित गोरखे व विश्वस्त श्री विलास जेऊरकर यांनी शाळा व्यवस्थापक प्रिया गोरखे, प्राचार्य तसेच सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.