पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
खान्देश मराठा पाटील समाज संघाचा वर्धापन दिन मेळावा आकुर्डी येथील खंडोबा माळ सभागृह येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त नीलेश भदाने यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, शेखर चिंचवडे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे तसेच, राजेंद्र साळुंखे, पाटील बुवा चिंचवडे, पत्रकार शीतल पवार, उद्योजक दीपक पाटील आदी उपस्थित होते.
मेळाव्यात भिला पाटील (सामाजिक कार्यगौरव), रवींद्र सूर्यवंशी (उत्कृष्ट कार्य गौरव), प्रवीण भामरे (खांदेश रत्न), गिरीश साळुंखे (युवा उद्योजक), किशोर पाटील (खान्देश गौरव), जितेंद्र शिंदे (समाजसेवा), चेतन साळुंखे (उद्योगरत्न), महेश पाटील (खान्देश गौरव), अॅड. विश्वासराव पाटील (सामाजिक न्यायभूषण), संदीप शिसोदे (उद्योग रत्न), डॉ. सोनाली पाटील (शिक्षण रत्न), वर्षा सोनवणे (महिला उद्योजक) आणि मयूर पाटील (वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर) यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उपायुक्त निलेश भदाणे यांनी खानदेशातील विविध चालीरिती, युवकांना स्पर्धा परीक्षेच्या सरावाबद्दल मार्गदर्शन केले. गायक जगदीश सदानशिव, अंजना बर्लेकर, अभिनेत्री श्रावणी मोरे यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. हास्य सम्राट अभिनेता विलास शिरसाट यांनी कार्यक्रमात धम्माल आणली.संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. भटुलाल बागुल व भानुप्रिया पाटील यांनी सुत्रसंचालन केले. सचिव शंकर पाटील यांनी आभार मानले. उद्योजक शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भामरे, शंकर पाटील, शिवाजी पाटील, प्रदीप शिरसाट, देविदास पाटील यांनी संयोजन केले.