पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने औद्योगिक सुरक्षा स्पर्धा भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे घेण्यात आली. स्पर्धेत 35 कंपन्यातील 501 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
उद्घाटन एसकेएफ कंपनीचे सेफ्टी हेड राहुल बोकील व थरमॅक्स इंडिया पॉवर डिव्हीजनचे बिझनेस एक्सलन्स हेड गौरव शर्मा यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी फोरमच्या पुणे शाखाध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, सदस्य डॉ. अजय फुलंबरकर, माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर, संजीव शिंदे, भूपेश मॉल आदी उपस्थित होते.
स्पर्धेत 61 केस स्टडीज, 25 स्किट, 90 पोस्टर्स, 60 श्लोगन यांचा समावेश होता. एकूण 236 जणांना नामांकन प्राप्त झाले. कोथरुड येथील कमिन्स इंडियाचे प्लाँटचे सेफ्टी हेड विजय हिरेमठ, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी संयोजन केले. विजया रुमाले यांनी सुत्रसंचालन केले.