पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजपने त्यांचे निवडणूक चिन्ह व पक्षाच्या प्रचाराचे घोषवाक्य रंगविली आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करून भाजपचे निवडणूक चिन्ह व पक्षाच्या प्रचाराचे घोषवाक्य हटविण्यात यावे, अशी तक्रार जिल्हाधिकारी व पुणे निवडणूक विभागाकडे करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. शहरामध्ये आचारसंहितेचा भंग होताना दिसत आहे. संपूर्ण शहरामध्ये जागोजागी भाजपाने त्याचे निवडणूक चिन्ह कमळ व ’अब की बार मोदी सरकार’, ’अब की बार भाजप सरकार’ अशा प्रकारची घोषवाक्य भिंतीवर रंगविलेले आहेत. यामुळे राजकीय पक्षांसाठी घालून दिलेल्या आचारसंहितेचा भंग होत आहे. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन शहरामध्ये भिंतीवर रंगविण्यात आलेले भाजपचे कमळ चिन्ह व घोषवाक्य तात्काळ हटविण्यात यावेत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिरादार यांनी केली आहे.