निर्भीडसत्ता न्यूज –
सर्वच नागरिकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे रात्री अपरात्री अपघाती रुग्ण किंवा गंभीर आजारी रुग्णांना रुग्णालया शिवाय पर्याय नसतो आणि एवढ्या वेळेत जीवितास काहीही होवु शकते. यामुळे रुग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयू) व 24 तास तातडीक सेवा देणे गरजेचेच आहे व ते सुश्रुत रुग्णालयाने उपलब्ध करून दिले असल्याचे मत पुणे येथील प्रख्यात डॉ. शिरीष प्रयाग यांनी तालुका खेड येथील राजगुरूनगर येथे व्यक्त केले.
डॉ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते अतिदक्षता विभाग (आयसीयू) व सीटी स्कॅन या विभागाचे उदघाटन करण्यात आले त्या वेळी डॉ. प्रयाग बोलत होते.
डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. दिलीप बांबळे, डॉ. प्रमिला बांबळे व रुग्णालयाचे सर्व पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. शिरीष प्रयाग म्हणाले कि, हॉस्पिटलमधील ‘आयसीयू’, तेथील उपचारप्रणाली, अद्ययावत साधनसामुग्रीमुळे तेथील पेशंट्सला क्रिटिकल केअर मिळणे सोपे आहे. सर्वसामान्य जनतेला तातडीने उपचार मिळण्यासाठी नक्कीच या विभागाची मदत होईल. सुश्रुत रुग्णालय हे सर्वसामान्यांचे रुग्णालय म्हणून ओळख आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब, कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांसाठी औषधोपचार दिले जातात.
डॉ. दिलीप बांबळे म्हणाले कि, विविध आजारावर तातडीने उपचार होण्यासाठी अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाला दाखल करावे लागते. त्यामुळे अत्याधुनिक सेवा सुविधा सर्वसामान्य जनतेस उपलब्ध व्हाव्यात या हेतूने अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. तसेच अत्याधुनिक सुविधा,डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांची 24 तास सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ. बांबळे यांनी दिली.