निर्भीडसत्ता न्यूज, लोणावळा – लोणावळ्यातील भुशी धरणाजवळील डोंगरावरून पाय घसरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १६) दुपारी घडली.
संतोष सोनकांबळे (वय 23, रा. हडपसर, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष काही मित्रांसमवेत भुशी धरण परिसरात गेला होता. धरणाच्या मागच्या डोंगरावर चढताना त्याचा तोल जाऊन तो पडला. त्यावेळी त्याचं डोकं दगडावर आपटल्याने तो जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
भुशी धरणावरील दरवर्षी अपघाती मृत्यू होण्याच्या घटना घडतात. यावर्षी ते टाळण्यासाठी उपाययोजना करत पर्यटकांवरही काही बंधने घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील पर्यटकांची हुल्लडबाजी आणि अपघात काही थांबत नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.