नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व कमल घोलप यांची मागणी
निर्भीडसत्ता न्यूज –
निगडी यमुनानगर येथे महपालिकेचे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे क्रिडा संकुल अस्तित्वात आहे पण संकुलाची दुरावस्था झाली असुन खेळाचे नुसते फलक लागले असुन सद्यस्थितीत येथे कुठलीही खेळाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तरीपण याची गांभीर्याने दखल घेतली तर या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे मल्टीस्पोर्ट ग्राउंड होऊ शकते यासाठी स्थानिक नगरसेवक प्रा उत्तम केंदळे व कमल घोलप यांनी पुढाकार घेत सहाय्यक आयुक्त योगेश कडुसकर यांची भेट याची मागणी केली आहे.
नगरसेवक केंदळे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच फ क्षेत्रीय अधिकारी मनोज लोनकर यांनाही मागणीचे निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,”यमुनानगर निगडी आणि सेक्टर २२ येथे महापालिकेच्या २ शाळा तसेच माता अमृतानंदमयी विद्यालय, शिवभुमी विद्यालय, मॉडर्न विद्यालय, एस.पी.एम विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय या शाळामधे तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या हजारोंच्या घरात असुन क्रिडाप्रेमी नागरिकही या भागात मोठ्या प्रमाणात राहतात, त्याचबरोबर याठिकाणी व्यायामशाळा, व स्विमिंगपुल याकडेही नागरिक व तरुणांचा मोठ्या प्रमाणात कल आहे.
या सर्वांची दखल घेत आपल्या भागात एक सुसज्ज “मल्टीस्पोर्ट कॉम्प्लेक्स” महापालिकेच्या वतीने बांधण्यात यावे त्यात जास्तीत जास्त मैदानी व अंतरगृही (इनडोर) खेळांचा समावेश करण्यात यावा त्यात प्रामुख्याने टेनिस, कबड्डी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब, हॉलीबॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कराटे, कौशल्य विकासाचे खेळ, धनुर्विद्या अशा खेळांचा तसेच योगा केंद्र याचाही त्यात समावेश असावा त्यासाठी लागणारे साहित्य व कोच याचीही व्यवस्था करण्यात यावी.
यमुनानगर निगडी येथे जर अशाप्रकारचे मल्टी स्पोर्ट ग्राऊंड व कॉम्प्लेक्स बांधल्यास त्याचा खुप मोठ्या प्रमाणावर खेळाडू व खेळाची आवड असणाऱ्या मुलांना फायदा होऊ शकतो, तरुण पिढी वाम मार्गाला न जाता खेळाकडे वळून चांगले खेळाडू येथे घडू शकतील.
पिंपरी चिंचवड शहरात जास्तीत जास्त प्रकारे मैदानी खेळाचे प्रशिक्षण वर्ग राबविले, मल्टीस्पोर्ट ग्राऊंड तयार केले तर शहरातील तरुण खेळातही आपले कौशल्य दाखवतील त्यामुळे प्राथमिक स्वरुपात सुरुवात, यमुनानगर येथुन मल्टीस्पोर्ट ग्राऊंडची चांगली व्यवस्था करण्यात यावी, क्रिडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळांचे प्रशिक्षण वर्ग याठिकाणी भरविण्यात यावे. विविध स्पर्धा व मार्गदर्शन केंद्र याठिकाणी असावे निगडी येथील सर्व शाळांना या मल्टीस्पोर्ट कॉम्प्लेक्समधे स्थान द्यावे.
तरीही वरील मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात येवून लवकरात लवकर येथे “मल्टी स्पोर्ट ग्राऊंड व कॉम्प्लेक्स” याची व्यवस्था करावी” ही मागणी त्यात केली आहे