निर्भीडसत्ता न्यूज –
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात वैवाहिक जीवनात 50 वर्ष पुर्ण झालेल्या 55 दांपत्यांचा तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, कामगार आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सोलापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, नाना काटे, हनुमंत गावडे, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, नगरसेवक राजू मिसाळ, प्रवक्ते फजल शेख, संघटक अरुण बो-हाडे, विजय लोखंडे, पल्लवी पांढरे,कविता खराडे, मनिषा गटकळ, प्रकाश सोमवंशी, अमोल भोईटे, गंगा धेंडे, पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, शीला भोंडवे, अरुणा कुंभार, विजया काटे आदी उपस्थित होते.
अजितदादा हे स्पष्ट वक्त आहेत. एखादे काम होणार असेल आणि नसेल होणार तर ते स्पष्ट सांगतात. दादा सत्तेत असोत किंवा नसोत त्यांच्या मागे सर्वपक्षिय कार्यकर्त्यांचा नेहमीच गराडा असतो असे सांगत सोलापूरकर म्हणाले, दादांनी पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. देशात विकसनिल शहर म्हणून पिंपरीचे नाव घेतले जाते. परंतु, तरीही जनतेने राष्ट्रवादीला नाकारले आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविले.
विलास लांडे म्हणाले, शहराचा सर्वांगीण विकास करुनही लोकांनी आम्हाला नाकारले याची खंत वाटते. पालिकेत भाजपची सत्ता आली असून त्यांना कामकाज करता येत नाही.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे – अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, राजू घुले, शरीर सौष्ठव विजेता संग्राम चौगुले, पहिले ऑलंपिक पदक विजेते मारुती आडकर, अॅथेलेटिक्स रुस्तम पठाण, रामदास कुदळे, क्रिकेट बॉक्सींग संतोष माछरे, एव्हेरेस्टवीर श्रीहरी तापकीर, बॅडमिंटनपट्टू परब कुंभार, समिम सय्यद, रोल बॉल शुभम शेवते, खो-खो पट्टू आकाश खाडे, धनुर्विद्या पुरस्कार विजेती मृण्मयी शिंडकर, भारत केसरी विजय गावडे यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक विभागात डॉ. संगिता गायकवाड, उद्योजकांमध्ये लघु उद्योजक संघटनेचे शिल्पकार तात्या सपकाळ, अनिल ढोबळे, सागर साखरे यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत कामगार म्हणून इ-टॉल कंपनीच्या युनीयनचे नेत्तृव करणारे विनायक मोहिते, टाटा मोटर्सचे संदिप पवार, रमेश वाघेरे यांचा सन्मान करण्यात आला. वैवाहिक जीवनात 50 वर्ष पुर्ण झालेल्या पाडुरंग-अनुरधा पिल्ले यांच्यासह 55 दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.
शनिवारी सकाळी खराळवाडी, भोसरी, इंद्रायणीनगर, कासारवाडी, संत तुकारामनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पिंपरी चौकात वाहतुकीचे नियम पाळणा-या वाहनचालकांचा गुलाब पुष्प आणि एक पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, सुलक्षणा शिलवंत, कविता बहल, सेवादलाचे आनंदा यादव, कार्यालयीन सचिव रामदास मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनात योगेश बहल मंचाचे धनंजय नाईक, हरप्रितसिंग, विनीत बहल यांनी पुढाकार घेतला.