निर्भीडसत्ता न्यूज –
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सहा खासदारांना आज पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावर कागद उधळल्य़ाप्रकरणी निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे गौरव गोगोई, अधिररंजन चौधरी, रंजिता रंजन, एम.के.राघव, के.सुरेश, आणि सुश्मिता देव अशी या सहा खासदारांचा समावेश आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोठा गोंधळ घातला.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही सभागृहात हजर होते.